भांडुपमधील ड्रीम मॉलला भीषण आग
मुंबईतील भांडुप येथील ड्रीम मॉलला पुन्हा आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र आग मोठी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.