Tejas Thackeray : आजची शांतता, उद्याचं वादळ, तेजस ठाकरेंचं गिरगावात लावलेलं पोस्टर चर्चेचा विषय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेलं ऐतिहासिक बंड आणि त्यानंतर महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर या पार्श्वभूमीवर मूळ शिवसेना पक्षाच्या भवितव्याविषयीच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण सध्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसैनिकांनी मुंबईतील गिरगावात लावलेलं पोस्टर चर्चेचा विषय ठरतंय. हे पोस्टर आहे उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरेंचं. आजची शांतता, उद्याचं वादळ... नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव ठाकरे या आशयाचं पोस्टर लावण्यात आलंय. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसैनिकांना आता तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील एण्ट्रीची प्रतीक्षा असल्याचं पोस्टरवरुन दिसतंय.