Tejas Thackeray : आजोबांच्या पक्षाला बळ देण्यासाठी नातू मैदानात? तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री?

Continues below advertisement

Tejas Thackeray In Maharashtra Politics : शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) शिवसेना (Shivsena) वाचवण्यासाठी तहानभूक विसरून राज्यभर दौरे करत आहेत. अशातच राज्याच्या राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 'तेजस ठाकरे यांना राजकीय मैदानात उतरवावे' अशी मागणी युवासेनेनं उद्धव ठाकरेंकडे केली आहे.  युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियातही आपली ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आजवर जंगलात, दऱ्या खोऱ्यांमध्ये रमणारे तेजस ठाकरे राजकारणाच्या आखाड्यात शड्डू ठोकणार का हे पाहावं लागणार आहे.

ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा अपूर्ण आहे. गेल्या 5 दशकांपासून या कुटुंबाने राज्याच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेऊन त्याला आकार दिला आहे. पिढ्यानपिढ्या हे कुटुंब राजकारणाशी जोडले गेले आहे. आता यात आणखी एका नावाची चर्चा होत आहे.

ठाकरे आणि पवार या दोन घरांभोवती महाराष्ट्राचे राजकारण गेल्या पाच दशकांपासून केंद्रित आहे. पिढ्यानपिढ्या, राज्याच्या राजकारणाला या कुटुंबांकडून नवे चेहरे मिळत आले आहेत. आता यात एका नवीन नावाची चर्चा होत आहे, ती तेजस ठाकरे यांच्या नावाची. तेजस हे शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा आहे. 7 ऑगस्ट रोजी सामना वृत्तपत्रात त्यांच्या फोटोसह जाहिरातीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आणि तेजस देखील राजकारणात प्रवेश करणार की नाही याविषयी चर्चा सुरू झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram