Teera Kamat | आनंदाची बातमी! तीराला 'ते' औषध आज दिलं

Continues below advertisement

मुंबई : सहा महिन्याच्या तीराला जीन रिप्लेसमेंट उपचारांची गरज असून 'झोलजेन्स्मा’ हे औषध हवे होते, ते अमेरिकेतून आले आणि आज डॉक्टरांनी ते औषध तीराला दिले. त्याकरिता तिला माहीमच्या पी. डी हिंदुजा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे औषध दिल्यानंतर शनिवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. गेली काही महिने तीराच्या पालकांनी हे औषध तीराला मिळावे यासाठी मोठा संघर्ष केला. आज अखेर तिला हे औषध देण्यात आले असून तिची तब्येत लवकर ठिक व्हावी म्हणून तीरासाठी अनेकांनी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या, त्या सर्वासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.

गुरुवारी हे औषध अमेरिकेतून रुग्णालयात पोहचले, हे औषध देण्याचा परवाना हिंदुजा रुग्णालयाकडे आहे. शुक्रवारी हे औषध तीराला सलाईन मार्फत देण्यात आले. अजून एक दिवस तिला रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात येईल आणि शनिवारी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असून, तिला घरी सोडण्यात येणार आहे. अशा पद्धतीने या आजारावर औषध मिळणारी तीरा मुंबईतील दुसरं मूल असून यापूर्वी अशाच स्वरूपाचे इंजेक्शन एका बाळाला महिन्यापूर्वीच याच रुग्णालयात देण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत 11 बाळांना हे औषध देण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram