Teachers Strike | आझाद मैदानात शिक्षकांचं बेमुदत धरणे आंदोलन | मुंबई | ABP Majha
मुंबईतील आझाद मैदानात शिक्षक समन्वय संघाच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येतंय. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिलीए. आगामी दहावी आणि बारावी परीक्षांवर बहिष्कार घालत आहोत, त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असा पवित्रा आंदोलक शिक्षकांनी घेतलाय. प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना प्रचिलित नियमानुसार अनुदान देऊन तत्काळ निधी मंजूर करा, अशी मागणी शिक्षकांनी केलीए.. स्वाभिमानी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघ, मराठवाडा मुख्याध्यापक संघ, शिक्षण संघर्ष संघटना आशा अनेक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.