Teachers Andolan | बारावी परीक्षेचा निकाल लांबणार? वाढीव पदावरील शिक्षकांचा एल्गार
Continues below advertisement
राज्यातील बारावीच्या निकालाला उशीर होण्याची शक्यता आहे. कारण विविध महाविद्यालयातील वाढीव पदांवरील शिक्षकांनी आंदोलन सुरु केलंय.. मुंबईतील आझाद मैदानावर हे शिक्षक आंदोलनासाठी बसले आहेत... यातल्या १२९३ शिक्षकांकडे प्रत्येकी दोनशे उत्तर पत्रिका तपासण्यासाठी आल्या आहेत... त्यामुळे जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका तपासण्यावाचून पडून आहेत....
जोवर मागण्या पूर्ण होत नाही तोवर पेपर तपासणार नसल्याचा आक्रमक पवित्रा आंदोलक शिक्षकांनी घेतलाय. निकालाला उशीर झाल्यास सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असं आंदोलक शिक्षकांनी म्हटलंय.
दरम्यान एबीपी माझाच्या बातमीनंतर राज्यातील ५ शिक्षक आमदारांनी आंदोलकांची भेट घेतलीय..शिक्षकांच्या मागण्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांकडे मांडण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय..