Mumbai Tata Hospital:रुग्णांना खासगी लॅबकडे पाठवून कमिशन मिळवणारे टाटा रुग्णालयातील रॅकेटचा पर्दाफाश
Continues below advertisement
मुंबईतील टाटा रुग्णालयामध्ये मुंबई तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध रुग्ण उपचारासाठी दररोज येत असतात.. या रुग्णांना विविध वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतात. दरम्यान तपासणी यंत्रणा रुग्णालयात उपलब्ध असतानाही रुग्णांना खासगी लॅबकडे पाठवून कमिशन मिळवणारे टाटा रुग्णालयातील रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय.. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात 11 जणांना अटक करून 21 जणांनी विरोधात गुन्हा दाखल केलाय..टाटा मेमोरियल रुग्णालयातील सुरक्षा अधिकारी अनिल भोसले यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भोईवाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Continues below advertisement