Tanaji Sawant : तुम्हाला अंगठा छाप मंत्री दिसतो का? हाफकिनबाबतच्या प्रश्नांवर आरोग्यमंत्र्याचा संताप

शिंदे सरकारमधील तानाजी सावंत सध्या चांगलेत संतापलेत.. ((काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनात आरोग्य खात्यासंदर्भातील अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना तानाजी सावंत यांची भंबेरी उडाली होती. त्यानंतर पुण्यातील झंझावाती दौऱ्यावरुनही त्यांच्यावर टीका झाली. ))ससून रुग्णालयात हाफकिन माणसाकडून औषधं घेणं बंद करा असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केल्याचं वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालंय.. त्यानंतर तानाजी सावंत यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतंय... त्यामुळे सावंतांनी सोलापुरात प्रसारमाध्यमांविरोधात संताप व्यक्त केला... तुम्हाला अंगठाछाप मंत्री दिसतो का असा सवाल सावंत यांनी विचारला.... यावेळी सावंत यांनी आपल्या शिक्षणाचाही दाखला दिला... तसंच सत्तांतर पचनी पडत नसल्याने आपल्यावर आरोप केले जात असल्याचा दावाही त्यांनी केलाय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola