Children's Day Special Show:छोट्या पडद्यावर बाल कलाकारांचं वर्चस्व,बालदिनाच्या निमित्ताने धमाल गप्पा
Continues below advertisement
Children's Day Special Show: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला होता. लहान मुलांबद्दल असलेलं त्यांचं प्रेम लक्षात घेता दरवर्षी हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. खरंतर बालकांसाठी प्रत्येक दिवस हा खास आणि आनंददायी असतो. मात्र आजच्या या दिवशी लहान मुलं आणि त्यांचे पालक आपला आनंद इतरांबरोबर अधिक उत्साहीपणे साजरा करतात. लहान मुलामुलींमध्ये एकमेकांविषयी प्रेम वाढावं, तसेच जगभरातल्या मुलामुलींचे आयुष्य अधिक चांगलं आणि आनंदी बनावं हा उद्देश त्यामागे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी 20 नोव्हेंबरला बालदिन म्हणजे चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो.
Continues below advertisement