Nashik Sharad Pawar: स्वतंत्रयवीर सावरकरांचं लिखाण अजरामर- शरद पवार ABP Majha
नाशिकमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला. सावरकरांचं स्वातंत्र्यलढ्यातील कार्य मोठं होतं. सावरकर यांचं लिखाण आजरामर आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही, असं पवार म्हणाले. कुसुमाग्रज यांचे कार्यही महान होते, मग वाद कशासाठी? असा सवाल त्यांनी केला. नाशिकच्या साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उचित गौरव झाला नसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.या पार्श्वभूमीवर पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल भाष्य केलं.....
Tags :
Nashik All India Marathi Literary Convention Nationalist Congress. President. Sharad Pawar. Swatantryaveer Savarak. Writing. Ajramar Kusumagraj .Devendra Fadnavis