Mumbai Gold smuggling : मुंबईत दर महिन्यात 200 किलो सोन्याची तस्करी? महसूल गुप्तचर खात्याकडून संशय

Continues below advertisement

मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये साडे चार कोटींचं ७ किलो ४०० ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या महसूल गुप्तचर खात्यानं ही कारवाई केली. यामध्ये एका एअरलाईन कर्मचाऱ्यासह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. . सर्व आरोपींना २ दिवसांची डीआरआय कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक महत्त्वाचं म्हणजे ही टोळी दर महिन्याला २०० किलो सोन्याची तस्करी करायची, असा आरोप डीआरआयनं कोर्टात केला आहे. यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा देखील संशय व्यक्त केला जातोय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram