Suraj Chavan : कथित खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाणांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी
मुंबई पालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. कोव्हिड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी या पूर्वीही सुरज चव्हाण यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.. ईडीने काल अटक केल्यावर आज सूरज चव्हाणांबाबत पीएमएलए कोर्टात सुनावणी पार पडली.. चव्हाणांना २२ जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलीय..