Sunil Raut : Sanjay Raut यांच्यावर सूडबुद्धीनं कारवाई, सुनील राऊतांचा आरोप
abp majha web team
Updated at:
05 Aug 2022 12:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVarsha Raut Property Details : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने (ED) आज चौकशीसाठी बोलावलं आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं वर्षा राऊत यांना समन्स बजावलं आहे. घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या (ED) अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावरून झालेल्या व्यवहाराबाबत चौकशीसाठी ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावावर खरेदी केलेल्या अलिबागमधील मालमत्तेची माहिती एबीपी न्यूजला मिळाली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि इतरांच्या नावे 10 ठिकाणी एकूण 36.86 चौरस मीटर जमीन खरेदी करण्यात आली आहे.