Sudhir Mungantiwar :70 सेकंदात 70 शिव्या,राऊतांचा विश्वविक्रम,कॉल रेकोर्डप्रकरणी मुनगंटीवारांचा टोला

Continues below advertisement

Sanjay Raut : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई सुरू आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील 'मैत्री' बंगल्यात ठाण मांडून आहेत. तर, दुसरीकडे मुंबई पोलिसांकडूनही राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. स्वप्ना पाटकर यांनी धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांकडून एफआयआर नोंदवण्यात येणार असल्याचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार स्वप्ना पाटकर यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना धमकी आणि शिविगाळ होत असलेली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यातील आवाज हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा असल्याची चर्चा होती. या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, स्वप्ना पाटकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी  वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेत स्वप्ना पाटकर यांना संरक्षण देण्याची मागणी केली होती. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram