Sudhir Mungantiwar on Ashok Chavan : काँग्रेसमधून मुक्त होण्याचा निर्णय त्यांनी घ्यावा ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेस मधून मुक्ती होण्याचा निर्णय त्यांनी घ्यावा,ज्यांचे सूर्यावर प्रेम आहे त्यांनी सूर्याच्या दिशेनी झेप घ्यावी,प्रत्येकांनी स्वतःचा, स्वनिर्णय घेणे ही लोकशाहीची सुंदरता आहे.देशभक्तीचा झेंडा हाती घेऊन हरघर तिरंगा हरमन तिरंगा घेऊन,मोदींजींच्या विचारावर विश्वास घेऊन पुढे जाव.रेडिओ ज्या गावचा असेल त्या गावच स्टेशन लागत.त्यामुळे त्यांनी काँग्रेस मधून लवकर मुक्त होण्याचा निर्णय घ्यावा असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलंय. दरम्यान मराठवाड्यातील काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्याने भाजपात लवकर येण्याच आमंत्रण दिलय,हे मात्र पाहावं लागेल. पण गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे मराठवाड्यातील बडे नेते अशोक चव्हाण यांची भाजपात जाण्याची चर्चा आहे, त्यामुळे हे आमंत्रण नेमके अशोक चव्हाण यांना तर नाही ना.
Continues below advertisement