Fuel from plastic in Kalyan | कल्याणामध्ये प्लास्टिक पासून इंधन निर्मितीचा प्रयोग यशस्वी
इंधन निर्मिती करण्यासाठी पालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागितली परवानगी. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने शून्य कचरा मोहीम राबविण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. शहरातील टाकाऊ प्लास्टिकपासून इंधन निर्मिती करणारा प्रकल्प बारावे येथील आरक्षित भूखंडावर उभारण्यात आला असून या प्रकल्पातून इंधन निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. रुद्र इन्व्हारमेंन्ट सोलुशन लिमीटेड आणि महानगरपालिका यांच्या वतीने सीएसआर फंडातून सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पातून 85 लिटर इंधन तेलाची निर्मिती करण्यात आली.