Thane Student Death : ठाण्यात विद्यार्थ्याचा शाळेतच संशयास्पद मृत्यू, मृतदेह घेण्यास पालकांचा नकार

ठाणे महापालिकेच्या मानपाडा शाळा क्रमांक ६४ या शाळेत शिकणारा विद्यार्थी कुणाल चंदनशिवेच्या मृत्यूनं ठाण्यात खळबळ निर्माण झाली आहे. चौथीत शिकणारा कुणाल दुपारच्या सुमारास अचानक बेशुद्ध पडला. त्यामुळं शाळेतील शिक्षकांनी त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात नेलं. पण त्या रुग्णालयानं कुणालला दाखल करून घेण्यास नकार दिला.त्यामुळं त्याला सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथल्या डॉक्टरांनी कुणालला मृत घोषित केले. आपल्या लेकाच्या झालेल्या मृत्यूनं कुणालच्या आईवडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. कुणालच्या मृत्यूबाबत त्यांनी शंका उपस्थित करून, शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola