KDMC Corona | वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत कठोर निर्बंध

कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये बुधवारी कोरोना रूग्णसंख्येचा नवा आकडा आला आणि सर्वच प्रशासकीय यंत्रणांची एकच धावपळ उडाली. बुधवारी कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 392 इतक्या  नव्या कोरोना रुग्णसंख्येने संपूर्ण प्रशासन हडबडून गेलं. 

ऑक्टोबर 2020 म्हणजेच 5 महिन्यांनंतर  इथल्या कोविड रुग्णसंख्येने 300 चा आकडा पार केल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डीसीपी विवेक पानसरे, एसीपी अनिल पोवार यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, इंडियन मेडीकल असोसिएशनचे डॉक्टर, आयुर्वेदिक, होमिओपॅथी असोसिएशन, महापालिका प्रभाग अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली. यामध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी करायच्या उपायांवर चर्चा करत काही निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola