ST Worrkers Strike : आंध्रप्रदेशच्या धर्तीवर विलिनीकरण करा ; एसटी संघटनेनं समितीसमोर बाजू मांडली

Continues below advertisement

 आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी... संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर 'मेस्मा' अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चेनंतर कारवाईला सुरुवात होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे एसटी महामंडळानं मेस्मा कारवाई सुरु केली तर  कोणत्याही नोटिशीविना संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अटक होऊ शकते. तसंच कायद्यानुसार एक वर्षाचा कारावासही होण्याची शक्यता आहे. दरम्यान, संपकऱ्यांविरोधात करण्यात आलेली कारवाई आता मागे घेण्यात येणार नाही असंही परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं. कारवाईत संपात सहभागी कुटुंब सुरक्षा योजनेंतर्गत घेतलेल्या जवळपास ६ हजार एसटी कर्मचाऱ्यांवर पहिली कुऱ्हाड कोसळणार असल्याचं समजतंय. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचे कर्मचारी गृहित धरावे यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्या समितीचं कामकाज काल झालं. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि सचिव हनुमंत ताटे यांनी मुख्य सचिव अध्यक्ष असलेल्या समितीसमोर एसटीच्या शासकीय विलिनीकरणासंदर्भात आपली बाजू मांडली.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram