ST Strike : एसटी कर्मचारी आंदोलनाबाबत ठाम! पाहा आहेत कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया
Continues below advertisement
कालपासून मोठ्या प्रमाणात एसटीचे कर्मचारी आझाद मैदानावर दाखल होतायत. सोबतच आंदोलनकर्ते अजून देखील आंदोलनावर ठाम आहेत. विलिनीकरणाच्या मागणी शिवाय मागे हटणार नसल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली आहे. उद्या एसटीसंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी आहे, त्यापार्श्वभूमीवर अनेक कर्मचारी आंदोलनस्थळी दाखल होत आहेत. मागील काही दिवसात महामंडळाकडून अनेक कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. सोबतच २ हजार ९३७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भात कर्मचाऱ्यांना काय वाटतं? आंदोलन कशाप्रकारे तीव्र करणार? आणि पुढील भूमिका काय असेल?
Continues below advertisement
Tags :
Msrtc St ST Strike Anil Parab ST Workers ST Privatization Anil Parab On ST Workers Anil Parab On ST Privatization