ST Workers Strike : ....तर आम्ही मंत्रालयाचाही ताबा घेतला असता; Kirit Somaiya

एसटी कामगारांना शासकीय सेवेत घ्यावं अशी मागणी करत आज मंत्रालयावर मोर्चासाठी निघालेल्या भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आणि नंतर आझाद मैदानात आणलं. भाजप नेते पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्रालयावर एसटी कामगारांचा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. सदाभाऊ खोत यांना वाशी टोलनाक्यावर रोखलं. तर पडळकर आणि सोमय्या आमदार निवासातून मंत्रालयाकडे निघाल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखलं आणि ताब्यात घेऊन आझाद मैदानाकडे घेऊन गेले. मंत्रालयात आंदोलनाची परवानगी नसल्यानं आझाद मैदानात आंदोलन करावं अशी सूचना पोलिसांनी केलीय.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola