ST Workers Morcha : एसटी संपावरुन राजकारण तापलं, प्रवीण दरेकर म्हणतात...

Continues below advertisement

ST Workers Strike : जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचारी संपावर ठाम असल्यानं आज तिसऱ्या  दिवशीही एसटी (ST Workers Strike) रस्त्यावर येण्याची शक्यता नाही. याऊलट संप अधिक चिघळणार असल्याचं दिसतयं.

आज एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा निघणारआहे. यासाठी राज्यभरातून एसटी कामगार मुंबईत दाखल होत आहेत. एसटी कामगारी आपल्या मागण्यांसाठी भाजपच्या नेतृत्त्वात आज मंत्रालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करणार आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्याद्वारे एसटी कामगारांना दीर्घ लढाईचं आवाहन केलं आहे.

तर दुसरीकेडे एस.टी. कर्मचारी संपाविरोधात महामंडळ आज अवमान याचिका हायकोर्टात सादर करणार आहेत. एकंदरीतच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची चिन्ह दिसत नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram