ST Azad Maidan : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची आझाद मैदानात कार्तिकी एकादशी...
मुंबईतील आझाद मैदानात मागील आठवड्याभरापासून एसटी महामंडळाचे कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही याठिकाणाहून हलणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. आज कार्तिकी एकादशी आहे यानिमित्ताने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात कार्तिकी एकादशी साजरी केली. आज सकाळपासूनच आझाद मैदानात भजन सुरू आहे. तसेच आज रात्री कीर्तन देखील याठिकाणी होणार आहे.