ST Worker Strike : एसटी संपकऱ्यांना अटक होणार? कामगार म्हणाले... ABP Majha
Continues below advertisement
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर 'मेस्मा' अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चेनंतर कारवाईला सुरुवात होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे एसटी महामंडळानं मेस्मा कारवाई सुरु केली तर कोणत्याही नोटिशीविना संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अटक होऊ शकते. तसंच कायद्यानुसार एक वर्षाचा कारावासही होण्याची शक्यता आहे. दरम्यान, संपकऱ्यांविरोधात करण्यात आलेली कारवाई आता मागे घेण्यात येणार नाही असंही परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं. कारवाईत संपात सहभागी कुटुंब सुरक्षा योजनेंतर्गत घेतलेल्या जवळपास ६ हजार एसटी कर्मचाऱ्यांवर पहिली कुऱ्हाड कोसळणार असल्याचं समजतंय.
Continues below advertisement