Covid Vaccination | एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची मागणी

Continues below advertisement
कोरनामुळे एसटी महामंडळातील 107 कर्मचाऱ्यांचा आज पर्यंत मृत्यू झाला आहे. तर तब्बल साडेचार हजार कर्मचारी पॉझिटिव्ह होऊन निगेटिव्ह झाले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने आता तरी आमच्याकडे लक्ष द्यावं अशा पद्धतीची मागणी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार दररोज हे कर्मचारी तब्बल 45 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांच्या संपर्कात येतात. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी तत्काळ सर्व कर्मचाऱ्यांना कोव्हिडची लस देण्याची घोषणा करावी अशी मागणी सर्व कर्मचाऱ्यांना केली आहे. याबाबत बोलताना महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे सरचिटणीस मुकेश तिगोटे म्हणाले की, मुंबईत दररोज 100 ते 200 चालक बाहेरगावावरून बेस्ट सेवेसाठी येत आहेत. मुंबईतल्या प्रचंड गर्दीत हे चालक वाहक प्रवाशांच्या संपर्कात येत आहेत. आणि पुन्हा यातील अनेक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह होऊन गावी जात आहेत. परिणामी गावाकडे देखील कोरोना चा प्रसार होत आहे. त्यामुळे टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा देण्यासाठी आघाडीवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची शासनाने दखल घ्यावी आणि कोव्हिडं -19ची लस सर्वांना देण्यात यावी
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram