SSR Case | सुशांत आत्महत्या प्रकरणाचं ड्रग्ज कनेक्शन? रियाचे महत्त्वाचे व्हॉट्सअॅप चॅट ईडीच्या हाती
गणेश ठाकूर, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सीबीआयने या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. परंतु, याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास करणाऱ्या ईडीने आरोपी रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअॅप चॅटची तपासणी सुरु केली आहे. या तपासातून खुलासा करण्यात आला आहे की, रिया चक्रवर्ती एका ड्रग डीलरच्या संपर्कात होती. या प्रकरणी पुढील तपासासाठी ईडीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ची मदत मागितली आहे.
ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने एनसीबीला पत्र लिहलं आहे, ज्यामध्ये याप्रकरणातील ड्रग अँगलचा तपास करण्यासाठी मदत मागितली आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल तर नाही हे जाणून घेण्याचा हेतू आहे.