Kishori Pednekar Enquiry : कथित SRA घोटाळा प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांची चौकशी
Continues below advertisement
Mumbai : मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. दादर पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली. कथित एसआरए घोटाळयासंदर्भात ही चौकशी झाल्याचं कळतंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए घोटाळ्याचे आरोप केले होते. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे. तर याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडणार असल्याची माहिती किशोरी पेडणेकरांनी दिलीय...
Continues below advertisement