Dharavi Coronavirus Case | मी धारावी बोलतेय... आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाला हरवतेय
गेले तीन महिने आपण सगळेच कोरोनाचं थैमान बघतोय. पण, या स्थितीतही पाय घट्ट रोवून उभ्या राहणाऱ्या धारावीकरांनी जे करुन दाखवलंय ते अजून भल्या भल्ययांनाही जमलेलं नाही. मुंबईत सर्वात मोठ्ठा हॉटस्पॉट असलेल्या माझ्या अरुंद गल्ल्या. मंगळवारच्या 24 तासात इथे फक्त 1 रुग्ण सापडलाय. पाठोपाठ संपूर्ण मुंबईतही पहिल्यांदाच एका दिवसात 806 इतके सर्वांत कमी कोरोनारुग्ण आढळलेत. कोरोना हॉटस्पॉट धारावी ते कोरोनाशी टक्कर घेणारी डॅशींग धारावी असा माझा गेल्या दोन महिन्यातला प्रवास राहिलाय. या प्रवासादरम्यान मी बरंच काही अनुभवत होती आणि अजूनही अनुभवतेय.