Special Report | मुंबईत दिवसाढवळ्या झाडांची हत्या, 'झारा'कडून झाडांवर विषप्रयोग? | ABP Majha
दक्षिण मुंबईत अॅसिडचं इंजेक्शन देऊन 40-50 वर्षे जुन्या झाडांची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. झारा ब्रॅण्डच्या दक्षिण मुंबईतल्या शोरुमसमोरची चार झाडं अशा पद्धतीनं मारण्यात आली आहेत. झाराच्या व्यवस्थापनानं व्यावसायिक लाभासाठी हे कृत्य केलं असल्याचा आरोप वनशक्ती या पर्यावरणप्रेमी संघटनेनं केला आहे. या प्रकरणाची तक्रार करून एक वर्ष उलटल्यानंतरही चौकशी सुरू झालेली नाही. पाहूयात काय आहे झाराच्या शोरूमसमोरच्या झाडांचं हे प्रकरण?