South Mumbai Lok Sabha : भाजपसह शिवसेनाही दक्षिण मुंबईसाठी आग्रही
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSouth Mumbai Lok Sabha : भाजपसह शिवसेनाही दक्षिण मुंबईसाठी आग्रही
मुंबईतल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीचा नेमका उमेदवार कोण, याबाबतचा पेच अजूनही कायम असल्याचं चित्र आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी आमदार यामिनी जाधव यांच्या उमेदवारीची चर्चा असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण भाजपनं या मतदारसंघावरचा आपला दावा अजूनही सोडलेला नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा या भाजपच्या संभाव्य उमेदवारांच्या मतदारसंघातल्या भेटीगाठी अजूनही सुरु आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोबत शिवडीतल्या मंडळांना भेटी दिल्या. मंगलप्रभात लोढा हेही मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. त्यामुळं दक्षिण मुंबईत महायुतीचा नेमका उमेदवार कोण, याविषयीचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. पण यामिनी जाधव, राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा या तिघांपैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, असं चित्र आहे.