BMC notice to Sonu Sood | सोनू सूदला हायकोर्टाचा दणका; मुंबई पालिकेविरोधातील याचिका फेटाळली

Continues below advertisement

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला हायकोर्टानं दिलासा देण्यास नकार दिला आहे. सोनू सूदची मुंबई महापालिकेविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पालिकेनं सोनू सूदविरोधात जी कारवाई केली आहे, ती योग्यच आहे, असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे.

सोनू सूदनं जुहू येथील एका निवासी इमारतीममध्ये व्यावसायिक वापरासाठी बदल केले होता. त्यासाठी पालिकेनं याआधी दोन वेळा बांधकाम तोडल्याची कारवाई केली होती. परंतु, प्रत्येक कारवाईनंतर सोनू सूदनं त्याच जागी पुन्हा नव्यानं बांधकाम केल्याचं पालिकेच्या निदर्शनास आलं होतं. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या वतीनं सोनू सूद विरोधात जुहू पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली होती. या सर्व कारवाई विरोधात सोनू सूदनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दरम्यान, सोनू सूदविरोधात कारवाई करण्याचा आता मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांचाही मार्ग मोकळा झाला आहे. कारण मुंबई महानगरपालिकेनं सोनू सूदविरोधात जुहू पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. तसेच हायकोर्टाच्या निर्णयानंतर पालिकेनं सोनू सूदला जी नोटीस पाठवली होती, त्यापुढील कारवाई करण्याचाही मार्ग आता मोकळा झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram