Kirit Somaiya : सोमय्यांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर पुन्हा निशाणा ABP Majha

Kirit Somaiya News : हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठं लपवलं आहे हे मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) सांगावं. ठाकरे परिवाराशी संबंध असलेल्या चतुर्वेदीला फरार घोषित करा. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, श्रीधर पाटणकर यांच्याशी चतुर्वेदीचे व्यवहार समोर आले आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटलं आहे. नंदकिशोर चतुर्वेदीच्या कंपन्यांची यादी समोर आली आहे. बहुतेक त्यांच्या या सगळ्या कंपनी एकाच पत्तावर रजिस्टर आहेत. ते चतुर्वेदी गायब आहेत, त्यांना फरार घोषित करावं, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola