Kapil Patil : मुंबई सोलापूर वंदे भारत कल्याणला थांबणार : कपिल पाटील
Continues below advertisement
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमधील महाराष्ट्रात दोन एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. त्यापैकी मुंबई शिर्डी एक्स्प्रेसला कल्याण येथे थांबा आहे. तर आता मुंबई सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसही कल्याणला थांबणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंंत्री कपिल पाटील यांनी दिलीय... त्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकारात्मकता दर्शविली असून लवकरच कल्याण या ठिकाणी मुंबई सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस ला थांबा मिळणार असून याचा फायदा कल्याण सह समस्त ठाणे जिल्ह्यातील नागरीकांना होणार असल्याचंही पाटील यावेळी म्हणालेत...
Continues below advertisement