Sahyadri Slab Collapsed : आदित्य ठाकरेंच्या बैठकीदरम्यान स्लॅब कोसळला, सुदैवाने कुणालाही दुखापत नाही
सह्याद्री अतिथीगृहात मुख्यसभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लँबसह कोसळले. आज संध्याकाळी पावणेपाच वाजता सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरच शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळले. अचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र दुर्घटना जीवघेणी होती त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.
Tags :
Bmc Vaccination Vaccination Mumbai Aaditya Thackeray Aditya Thackeray Worli Sahyadri Guest House