Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू
उल्हासनगर : उल्हासनगर: नेहरू चौकातील बँक ऑफ बडोदा समोर साई सिद्धी या पाच मजली इमारतीचा स्लॅब (Ulhasnagar Building Collapse)कोसळल्याची घटना घडली आहे. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आणखी दोन जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.