#Coronavirusoutbreak | कोरोनामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घट, पेट्रोल-डिझेल दर स्वस्त
कोरोना विषाणूचा जगभरात फैलाव होत असताना रशिया आणि ओपेकमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत मोठं दरयुद्ध पाहायला मिळतंय. सौदी अरेबियानं आधीच कच्च्या तेलाच्या किमती कमी केल्या आहेत. तर, जगभरात पर्यटकांची संख्या घटल्यानं
त्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर झालाय. तरी, आपल्या देशातील इंधन दरावरही कोरोनाचा परिणाम झालेला दिसतोय. पेट्रोल-डिझेलच्या किमती सरासरी २५ पैशांनी घसरल्या आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोनाच्या दहशतीचं सावट असलं तरी वाहनचालकांना किंचितसा दिलासा मिळालाय.