Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे

मुंबई : गणेशभक्तांचे आराध्यदैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिरासंबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. ड्रेसकोड संदर्भातलं सिद्धीविनायक मंदिर न्यासाकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं आहे. सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजे तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचं पत्र मंदिर न्यासाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

सिद्धीविनायक मंदिरातील प्रवेशासाठीचा हा ड्रेसकोड पुढच्या आठवड्यापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सदस्य राहुल लोंढे यांनी दिली. 

अनेक भाविकांकडून या आधी तक्रारी

सिद्धीविनायक मंदिरात देशभरातून रोज हजारो भाविक येत असतात. त्यामध्ये अनेकांचा पेहराव हा इतरांना संकोच वाटणारा ठरतोय अशा तक्रारी सातत्याने होत होती. त्यामुळेच सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अनेक भाविकांनीही त्यापद्धतीचे मत मांडलं होतं. या सगळ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola