Shridhar Patankar ED Raid : CM Uddhav Thackeray यांच्या मेहुण्यांना ईडी चौकशीला बोलवणार? ABP Majha
ईडीनं सत्ताधारी महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर तपासाचा मोर्चा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांकडे वळवला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर ईडीच्या रडारवर आलेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ईडीनं काल जप्तीची कारवाई केलेल्या पुष्पक ग्रुपशी संबंधित एका कंपनीनं श्रीधर पाटणकर यांना ३० कोटींचं विनातारण कर्ज दिल्याचा आरोप आहे... ईडीनं जप्त केलेल्या जप्त केलेल्या संपत्तीत श्रीधर पाटणकर यांच्या निलांबरी प्रोजेक्टमधल्या ११ सदनिकांचा समावेश आहे.. पाटणकर हे मातोश्रीच्या अत्यंत जवळचे आहेत..मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंचे बंधू आहेत...नोटाबंदीच्या काळापासून पटेल कुटुंबीयांचा पुष्पक ग्रुप अडचणीत आहे आणि ईडीच्या रडारवर आहे. त्याच कंपनीशी संबंधित एका व्यवहारात आता श्रीधर पाटणकर यांची चौकशी होण्याची शक्यता आहे... ईडीनं पुष्पक ग्रुपची ६ कोटी ४५ लाखांची संपत्ती जप्त केलीय..