Mumbai Crime : काळाचौकी घटनेमागचं धक्कादायक वास्तव, आईनंच केलो मुलीचा खुन

मुंबई : काळाचौकी परिसरातून बेपत्ता झालेल्या तीन महिन्याच्या चिमुकलीच्या अपहरण नाट्याचं धगधगतं वास्तव समोर आलं आहे. बेपत्ता मुलीचा शोध संपला असून, आईनेच मुलीची हत्या केल्याचं दाहक वास्तव समोर आलं आहे. मुलगी नको होती म्हणून आईनेच हत्या करुन चिमुकलीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत ठेवला. त्यामुळे हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेतील चिमुकलीचा शोध आता थांबला आहे. दोन दिवसापूर्वी काळाचौकी परिसरातून तीन महिन्याची चिमुकली गायब झाली होती.  मात्र आता आईनेच मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.  या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola