Prabhadevi Shivsena Rada : ठाकरे -शिंदे गट आमनेसामने, सदा सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप

Prabhadevi Shivsena Rada : शिवसेनेतल्या शिंदे आणि ठाकरे गटांतला वाद गणपती विसर्जन मिरवणुकांतही दिसला आणि मुंबईतल्या प्रभादेवीत तर या वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी यावेळी हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केलाय. तर असं काही घडलं नाही, असं सांगत आमदार सरवणकर यांनी हे आरोप फेटाळले आहेत. विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादानंतर शिंदे समर्थक संतोष तेलवणे यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या पोस्टमध्ये अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संतोष तेलावणे यांना मारहाण केली असं सांगण्यात येतंय. त्यानंतर दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola