Shivsena | दादरा-नगरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला, कलाबेन डेलकर यांच्या विजयानंतर पोस्टरबाजी

दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. कलाबेन डेलकर यांनी  भाजपचे उमेदवार महेश गावित यांचा 51 हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला आहे. डेलकर यांच्या या विजयामुळे पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. खासदार मोहन डेलकर यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक झाली. मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola