Chhat Pooja 2021 : उत्तर भारतीय बांधवांच्या छट पूजेसाठी शिवसेना मदतीला, 4 कृत्रिम तलाव तयार करणार
Continues below advertisement
उद्या उत्तर भारतीयांचा छटपूजा हा पवित्र धार्मिक उत्सव आहे.हा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई च्या विविध समुद्र किनारी आणि तलावांवर मुंबईत मोठी गर्दी उत्तर भारतीय बांधव करीत असतात. मात्र यंदाच्या वर्षी कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मुंबई महानगर पालिकेने मुंबई च्या समुद्र किनारी आणि तलावांवर छटपूजेस बंदी घातली आहे.मात्र उत्तर भारतीय बांधवांना छट पूजा साजरी करता यावी म्हणून शिवसेना मात्र धावून आली आहे.शिवसेनेने मुंबईत छटपूजेसाठी कृत्रिम तलाव तयार करण्यास सुरुवात केली आहे.कुर्ला, साकीनाका, चांदीवली, पवई या परिसरात शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या वतीने चार कृत्रिम तलाव छटपूजेसाठी तयार करण्यात येत आहेत.
Continues below advertisement