Monsoon Session : विधान भवनाच्या पायऱ्यांवर रंगलं बॅनर युद्ध, शिंदे गटाच्या बॅनरला सेनेचं उत्तर

Maharashtra Assembly Session Aaditya Thackeray:  विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाच्या (Shivsena rebel mla) आमदारांनी थेट शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनाच लक्ष्य केले आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळांच्या पायऱ्यावर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट्या दिशेने बसलेल्या व्यंगचित्राचे बॅनर झळकावत घोषणाबाजी केली. आम्ही मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणार नसल्याचे वारंवारपणे शिंदे गटाकडून सांगण्यात येत होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून शिंदे गटाने मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केले आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola