भाजपचे नेते अजूनही 'पहाट' सोहळ्यांमध्ये गुंतून पडले: 'सामना'तून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jun 2021 11:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहाटेच्या शपथविधीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय. अशातच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून आज चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. भाजप नेते अजूनही दीड ते दोन वर्षांपूर्वीच्या पहाट सोहळ्यांमध्येच गुंतून पडलेत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. दरम्यान, अजित पवारांनी 54 आमदारांच्या सह्यांचं पत्र चोरणं, नैतिक की, अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला होता. यावरुन त्यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं.