ISupportRahulKulkarni | पत्रकाराला अटक करणं दुर्दैवी, राहुल कुलकर्णी यांना जामीन मिळाल्याचा आनंद : संजय राऊत
वांद्र्यातील गर्दी प्रकरणात सर्वात मोठा गुन्हेगार कोण असेल तर रेल्वे मंत्रालय आहे, सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट लिहिल्या ते आहेत. रेल्वे मंत्रालयावरही महाराष्ट्र सरकारने किंवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना वांद्रे सत्र न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यानंतर संजय राऊत यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत राहुल कुलकर्णी यांना जामीन मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
Tags :
Journalist Rahul Kulkarni Shiv Sena MP Bail Saamna Rahul Kulkarni Bandra Migrants Crisis Abp Majha Sanjay Raut