ABP News

Sanjay Raut on Arnab Goswami Arrest | पोलिसांकडे पुरावे असतील म्हणून कारवाई : संजय राऊत

Continues below advertisement

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "महाराष्ट्रात कायद्याने काम चालतं. जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. पोलिसांच्या हाती पुरावे लागले असतील," असं संजय राऊत म्हणाले.

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक हा काळा दिवस असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. तर महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे, असं विनय सहस्रबुद्धे यांनी म्हटलं आहे. याशिवाय भाजपच्या अनेक नेत्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावरील अटकेची कारवाई ही सूडबुद्धीने केल्याचं म्हटलं आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत भाष्य केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram