Shiv Sena MLA Disqualification : आमदारांच्या अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार विधानभवनात
शिवसेनेतल्या ऐतिहासिक फुटीच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी पार पडतेय. या सुनावणीला सामोरं जाण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून तयारी करण्यात आली आहे. शिंदे गटाचे ४० आणि ठाकरे गटाचे १४ अशा ५४ आमदारांच्या मिळून तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेणार आहेत. ठाकरे गट वकिलांमार्फत आपली बाजू मांडत आहे.