Shiv Sena Symbol:ठाकरेंच्या 'मशाल'ची परीक्षा,मशाल चिन्हासाठी समता पक्षाची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

Continues below advertisement

अंधेरीतील पोटनिवडणुकीत ठाकरेंची शिवसेना मशाल चिन्हावर लढतेय आणि प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर आता या चिन्हालाच आव्हान देण्यात आलंय. समता पक्षानं मशाला चिन्हाला दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्याचं ठरवलंय. समता पक्ष यावर आज कोर्टात याचिका दाखल करणार आहे. २००४ मध्ये समता पक्षाची राज्यातली मान्यता काढण्यात आली. त्यानंतर आता शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगानं ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल चिन्हं दिलं आहे. या चिन्हावर ठाकरेंची शिवसेना प्रथमच निवडणूक लढवत असताना समता पक्षानं याच चिन्हावर दावा केल्यानं कोर्टात काय होणार याकडे लक्ष लागलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram