Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेकडून दोन पत्र, पालिकेकडून निर्णय होल्डवर

Continues below advertisement

Mumbai News : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबतचा (Shiv Sena Dasara Melava) निर्णय मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) होल्डवर ठेवला आहे. गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) आटोपल्यानंतरच निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण महापालिका सहाय्यक आयुक्त सपकाळे यांनी दिलं आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) परवानगीकरता जी नॉर्थ विभागाला दोन वेळा पत्र देऊनही महापालिकेने अर्ज अनिर्णीत ठेवला आहे. सध्या सर्व स्टाफ गणेशोत्सवाकरता आवश्यक प्रशासनिक बाबी आणि तयारीत गुंतल्यामुळे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही, असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram