Shivaji Park Dasara Melawa : वाजत गाजत शिवाजी पार्कवर शिवसैनिक दाखल ABP Majha

आज दसरा आणि महाराष्ट्रात या उत्सवाला राजकीय महत्त्वही आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस म्हणून नागपुरात संघाचा विजयादशमी उत्सव यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा होतोय. तर यावर्षी शिवसेनेच्या दोन गटांकडून होणाऱ्या दसरा मेळाव्यांनी राज्याचं लक्ष वेधून घेतलंय.  या मेळाव्यासाठी ठाकरे गटानं शिवतीर्थावर जोरदार तयारी केलीय. तर शिंदे गटानं बीकेसी मैदानात जय्यत तयारी करून ठाकरेंना आव्हान दिलंय.... तिकडे सावरगावात भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा मेळावा होणार आहे. दसऱ्याच्या निमित्तानं राजकीय संदेश या मेळाव्यांतून दिला जातो. त्यात शिवसेनेत प्रथमच दोन गटांनी मेळावे आयोजित केल्यानं सत्तासंघर्षानंतरचा हा सामना रंगणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola